Posts

हिंदवी स्वराज्य

Image
हिंदवी स्वराज्याचा निर्माता भारताच्या इतिहासात अनेक राजांनी जनमानसात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला. परंतु छ‍त्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजांमध्ये एक मूलभूत फरक होता. बहुतांशी राजांनी आपापल्या वाडवडिलांच्या राजगादीवर विराजमान होऊन गादी चालविली. पण छत्रपती शिवाजी महाराज मात्र त्याला अपवाद होते. ते स्वत:च राज्य निर्माते होते. शुन्यातून जग निर्माण करण्याची जिद्द व हिंमत त्यांच्यात होती. मातोश्री जिजाबाईंचे प्रोत्साहन, गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचे मार्गदर्शन आणि मावळ्यांच्या मदतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 17 व 18 वे शतक म्हणजे महाराष्ट्रातील योद्यांच्या पराक्रमाची गाथा म्हटली जाते. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे मराठी स्वराज्याची स्थापना करायचं. छत्रपतींनी आपल्या मुत्सद्दीगिरी, शौर्य व आत्मबळावर हे स्वप्न साकार करुन दाखविलं. 19  फ्रेबुवारी 1630 या दिवशी या क्रांतीसूर्याचा जन्म झाला. शिवबाच्या जन्माने साडेतीनशे वर्षांच्या काळ्याकुट्ट अशा मोगल, आदिलशहा, सिद्दी यांच्या जुलूमी राजवटीचा अस्त झाला. जिजाऊ ही शिवबाजी केवळ जन्मदात्री नव्हती तर त्यांची त